• 29: बाळासाठी आईचं दूध अतिमहत्त्वाचं!
    2023/08/02
    नवजात बालकासाठी आईचं दूध हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याकडे आईचं दूध बाळासाठी महत्त्वाचं आहे, हे मान्य होत असले तरी त्यासाठी परिस्थिती आणखी अनुकूल बनणं गरजेचं आहे. घर असो वा कार्यालय, तेथे कार्यरत प्रत्येक घटकाने ही गोष्ट कशी समजून घ्यायला हवी, या विषयावर पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांनी साधलेला हा संवाद. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने, या सहसा फारशी चर्चा न होणाऱ्या मात्र अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे विविध पदर डॉ. पडळकर यांनी उलगडून दाखवले आहेत. शिवाय, त्यावर त्यांनी लिहिलेल्या आईचं दूध..बाळासाठी या प्रसिद्ध पुस्तकाची उलगडही या निमित्ताने करुन दिली आहे. 
    続きを読む 一部表示
    21 分
  • 28: हृदयरोग उपचारातील आधुनिक तंत्र
    2023/04/06
    हृदयरोग उपचार प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाने मोलाची भर घातली आहे. या तंत्रांचा नेमका कोणता फायदा आता रुग्णांना निदान व उपचारांत होतो आहे, त्यामुळे शस्त्रक्रियांचा सक्सेस रेट किती वाढला आहे, गंभीर व्याधी असणाऱ्या रुग्णांवर हृदयउपचार घेताना या तंत्रज्ञानाचा कोणता लाभ होणार आहे, हृदविकाराचे निदान करणाऱ्या तपासण्यांचा उद्देश काय असतो आणि त्यानंतर उपचाराची दिशा कशी ठरते या व अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उलगड केली आहे आरोग्यम् च्या या विशेष भागामध्ये. त्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत पळशीकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद आपल्याला हृदयरोग उपचारतंत्राची अत्यंत सोप्या शब्दांत उलगड करुन दाखवतो. जरुर ऐका आणि इतरांपर्यंतही पोहोचवावा, असा हा पॉडकास्ट. 
    続きを読む 一部表示
    35 分
  • 27: होमिओपॅथी समजून घेताना....
    2023/02/16
    होमिओपॅथी उपचारपद्धती अनेकांनी अनुभवली आहे. तरीही त्याविषयी कित्येकांच्या मनात काहीसं कुतुहल तर बऱ्याच प्रमाणात शंकाही आहेत. पुण्यातील प्रसिद्ध डॉ. ठाकूर्स होमिओपॅथीचे प्रमुख डॉ. सचिन ठाकूर आणि डॉ. मेघा ठाकूर यांनी आरोग्यम् पॉडकास्टच्या या माध्यमातून संतोष देशपांडे यांच्यासमवेतच्या संवादातून होमिओपॅथी उपचारपद्धती सोप्या शब्दांत उलगडून दाखवतानाच, त्याविषयीच्या शंकांचेही निरसन केले आहे. होमिओपॅथी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनीच जरुर ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा, असा हा आरोग्यम् चा खास भाग. 
    続きを読む 一部表示
    35 分
  • 26: कोविडची नवी लाट...आपल्यासाठी घातक??
    2022/12/23
    कोविडचा नवा व्हॅरिएन्ट BF.7 ने चीनमध्ये खळबळ माजवली आहे. जगातील अनेक देशांसह भारतातही त्याचा प्रसार होत असल्याच्या बातम्यांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ या परिस्थितीकडे कसे पाहतात, हे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच, आरोग्यम् च्या या विशेष भागामध्ये प्रसिद्ध अतिदक्षतातज्ज्ञ डॉ. कपिल झिरपे यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून पुढे आली, आपल्या मनातील अनेक प्रश्नांची, शंकांची सुस्पष्ट आणि आत्मविश्वास जागविणारी उत्तरे. जरुर ऐका आणि सर्वांपर्यंत आवर्जून पोहोचवावा, असा हा आरोग्यसंवाद! 
    続きを読む 一部表示
    21 分
  • 25: महाराष्ट्राचे आरोग्य अन् आरोग्यमंत्र्यांचे उपचार
    2022/12/14
    देशातील अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याची धुरा वाहणारे डॉ. तानाजी सावंत प्रथमच `आरोग्यम्` या आपल्या लोकप्रिय मराठी पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर खास आले अन् मनमोकळे बोलतेही झाले. राज्याच्या आरोग्याची धुरा वाहताना, त्यांना जाणवलेल्या गोष्टी, आव्हाने, त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरे, अल्पकाळातच राबवलेल्या विविध संकल्पना आणि एकूणच, राज्याच्या आरोग्याविषयक त्यांचा दृष्टिकोन यांची थेट उत्तरे ऐकूया, या पॉडकास्टमधून. रोखठोक मते आणि धडक कामाची पद्धत असणारे, हे आरोग्यमंत्री राज्यातील जनतेच्या आरोग्याप्रति किती गंभीर आहेत, किंबहुना, त्यांच्या विचारांची दिशा काय आहे, याचे दर्शन घडविणारा हा आरोग्यम् चा खास भाग. 
    続きを読む 一部表示
    23 分
  • 24: कॅन्सरची चाहूल....काय असावे पहिलं पाऊल?
    2022/06/09
    कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा शब्द ऐकला तरी घाबरायला होतं, इतकी त्याची धास्ती सर्वांना असते. अशा स्थितीत, कॅन्सर नेमका कसा होतो, त्याची प्राथमिक लक्षणं काय असतात, त्याचे निदान कसे होते, निदान झाल्यानंतर उपचाराची दिशा कशी ठरते हे सारं आपणास ठाऊक असणं गरजेचं आहे. पुण्यातील प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी अत्यंत साध्या-सोप्या शब्दांत आरोग्यम् पॉडकास्टमध्ये हे सारं उलगडून दाखवलं आहे संतोष देशपांडे यांसोबतच्या संवादातून. 
    続きを読む 一部表示
    55 分
  • 23: कोविडपश्चात आरोग्याची निगा!
    2022/04/28
    कोविडच्या तीन लाटांमध्ये सर्वांनाच कोविडसह विविध आजारांना तोंड द्यावं लागलं. कोविडचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी, इतर आजार बळवण्याची शक्यता आता वाढली आहे, त्यामुळे कोविडपश्चात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आपली जीवनशैली कशी असावी, मधुमेह असलेल्या रूग्णांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे आणि आपलं आरोग्य उत्तम कसं ठेवावं, यासारख्या तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, पुण्यातील प्रसिद्ध अतिदक्षता आणि मधुमेहतज्ज्ञ डॉ. कपिल बोरावके यांनी ‘आरोग्यम्’च्या या विशेष पॉडकास्टमध्ये!

    続きを読む 一部表示
    37 分
  • 22: लिव्हर फिट, तो जिंदगी हिट!
    2022/03/26
    काळीज... म्हणजेच यकृत किंवा लिव्हर... लिव्हर निरोगी असेल तर ते शरीरातील इतर अवयवांनाही फिट ठेवतं. त्यामुळे लिव्हरचं शारीरिकदृष्ट्या महत्त्व काय आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट केव्ह  केल  जातं? त्यासाठी डोनरचे निकष काय, लिव्हर हेल्दी ठेवायच  म्हणजे नक्की काय करायचे...अशा तुमच्या मनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, जागतिक कीर्तीचे यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ आणि पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटलच्या सेंटर फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांटचे प्रमुख डॉ. बिपीन विभुते यांनी... वेळात वेळ काढून ऐकावा असा हा पॉडकास्ट!
    続きを読む 一部表示
    46 分