『आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)』のカバーアート

आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)

著者: आरोग्यम्
無料で聴く

このコンテンツについて

आरोग्यम् धनसंपदा असं म्हणतात. प्रत्येकाने आपले आरोग्य कसे सांभाळले पाहिजे, काही विकार झालाच तर त्यावर कशी मात करता येऊ शकते, विविध रोगांवरच्या उपचारपद्धती नेमक्या कशा आहेत, कोणता विकार झाल्यास काय उपचार घेता येतात, फीट् आणि हेल्दी राहण्यासाठी उत्तम जीवनशैली कोणती …आपल्या मनातील अशा कितीतरी प्रश्नांची उलगड आरोग्यम् या आपल्या पॉडकास्टवर मान्यवर डॉक्टर्स, विषयतज्ज्ञांकडून केली जाणार आहे. उत्तम आरोग्यासाठी हे एक उत्तम श्रवण…त्याचा जरुर आस्वाद घ्या आणि निरोगी राहा….आनंदी राहा! प्रस्तुतकर्ता:  संतोष देशपांडे (Mediacura Infoline)Mediacura Infoline 衛生・健康的な生活
エピソード
  • 29: बाळासाठी आईचं दूध अतिमहत्त्वाचं!
    2023/08/02
    नवजात बालकासाठी आईचं दूध हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याकडे आईचं दूध बाळासाठी महत्त्वाचं आहे, हे मान्य होत असले तरी त्यासाठी परिस्थिती आणखी अनुकूल बनणं गरजेचं आहे. घर असो वा कार्यालय, तेथे कार्यरत प्रत्येक घटकाने ही गोष्ट कशी समजून घ्यायला हवी, या विषयावर पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना पडळकर यांनी साधलेला हा संवाद. जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने, या सहसा फारशी चर्चा न होणाऱ्या मात्र अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे विविध पदर डॉ. पडळकर यांनी उलगडून दाखवले आहेत. शिवाय, त्यावर त्यांनी लिहिलेल्या आईचं दूध..बाळासाठी या प्रसिद्ध पुस्तकाची उलगडही या निमित्ताने करुन दिली आहे. 
    続きを読む 一部表示
    21 分
  • 28: हृदयरोग उपचारातील आधुनिक तंत्र
    2023/04/06
    हृदयरोग उपचार प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाने मोलाची भर घातली आहे. या तंत्रांचा नेमका कोणता फायदा आता रुग्णांना निदान व उपचारांत होतो आहे, त्यामुळे शस्त्रक्रियांचा सक्सेस रेट किती वाढला आहे, गंभीर व्याधी असणाऱ्या रुग्णांवर हृदयउपचार घेताना या तंत्रज्ञानाचा कोणता लाभ होणार आहे, हृदविकाराचे निदान करणाऱ्या तपासण्यांचा उद्देश काय असतो आणि त्यानंतर उपचाराची दिशा कशी ठरते या व अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उलगड केली आहे आरोग्यम् च्या या विशेष भागामध्ये. त्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजीत पळशीकर यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद आपल्याला हृदयरोग उपचारतंत्राची अत्यंत सोप्या शब्दांत उलगड करुन दाखवतो. जरुर ऐका आणि इतरांपर्यंतही पोहोचवावा, असा हा पॉडकास्ट. 
    続きを読む 一部表示
    35 分
  • 27: होमिओपॅथी समजून घेताना....
    2023/02/16
    होमिओपॅथी उपचारपद्धती अनेकांनी अनुभवली आहे. तरीही त्याविषयी कित्येकांच्या मनात काहीसं कुतुहल तर बऱ्याच प्रमाणात शंकाही आहेत. पुण्यातील प्रसिद्ध डॉ. ठाकूर्स होमिओपॅथीचे प्रमुख डॉ. सचिन ठाकूर आणि डॉ. मेघा ठाकूर यांनी आरोग्यम् पॉडकास्टच्या या माध्यमातून संतोष देशपांडे यांच्यासमवेतच्या संवादातून होमिओपॅथी उपचारपद्धती सोप्या शब्दांत उलगडून दाखवतानाच, त्याविषयीच्या शंकांचेही निरसन केले आहे. होमिओपॅथी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनीच जरुर ऐकावा आणि इतरांनाही ऐकवावा, असा हा आरोग्यम् चा खास भाग. 
    続きを読む 一部表示
    35 分

आरोग्यम् (Aarogyam- Marathi podcasts on Health & Wellness)に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。