エピソード

  • # 1615: मुक्ती. लेखक:- स्वाती नितीन ठोंबरे कथन :- सौ नीता दिनेश प्रभू
    2024/11/02

    "आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1614: इव्हेंट. लेखक:- स्वप्ना (मायी)मुळे कथन:- सौ निता दिनेश प्रभू
    2024/11/01

    " फक्त आदर आदर ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंट मध्ये सापडलं ग मला ह्या लख्ख झालेल्या घंगाळा सारखं.क्षण जगून घ्यावा हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला,..म्हणून मी आता ठरवलं आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी"

    続きを読む 一部表示
    5 分
  • # 1613: आगळी वेगळी दिवाळी, ले.सुजाता लेले, कथन: ( मीनल भडसावळे )
    2024/10/31

    ही गोष्ट आहे दुष्काळग्रस्त भागात अन्नपाण्याअभावी झालेल्या परिस्थितीची .तिथे जाऊन मनू आणी तिच्या कुटुंबियांनी त्यांची दिवाळी साजरी केली, त्या लोकांना चार चांगले क्षण उपभोगायला दिले. तसेच त्या खडतर परिस्थितीत जगणाऱ्या कणखर लोकांच्या रूपाने मुलांना वास्तवाचे भान देणार्‍या कुटुंबाची आगळीवेगळी गोष्ट आहे.

    続きを読む 一部表示
    5 分
  • #1612: कुठे थांबायचं हे नक्की झालं तो संतुष्ट. लेखक: अनामिक. कथन: (सौ निता दिनेश प्रभू )
    2024/10/30

    " आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. हाव कमी होत नाही.कमीच पडतो. या पैशा मागे लागून घर, झोप, नाती,प्रेम , मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही. या कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे."

    続きを読む 一部表示
    4 分
  • 1611: इमेज जपताना. लेखक:- सौ.विदुला जोगळेकर कथन:- सौ निता दिनेश प्रभू
    2024/10/29

    " प्रत्येक नात्यात तू उत्तमच आहेस...पण एक माणुस म्हणुन...तुझ्यातली स्त्री अत्यंत संवेदनशील, कर्तव्य तत्पर आहे. तुझ्या देहबोलीतूनच तुझी इमेज
    माझ्या मनात चढत्या आलेखात निर्माण झाली होती, त्याच्या कैकपटीने...तू प्रगल्भ आहेस. सन्मानित होणं आणि सन्मानित करणं..तुझ्याकडून शिकावं,सलामच तुला!
    ती प्रसन्न हसली.."

    続きを読む 一部表示
    5 分
  • # 1610: निर्व्याज . लेखिका : धनश्री लेले कथन : (डॉ. गीतांजली राव )
    2024/10/28

    रस्त्याच्या बाजूला टोपलीत भाजी घेऊन विकायला बसलेल्या गरीब भाजीवालीशी एक दोन रुपयांची घासाघीस करणारे कारमधून ये जा करणारे श्रीमंत लोक, आपण अर्धपोटी राहून आपल्या समोरच्या कुत्र्याला आपल्यातली शिळी भाकरी देणारं भिकारणीचं शेंबडं पोर, काही निस्वार्थी लोक, आणि काहींच्या रुपात असलेली चालती बोलती देवस्थाने पाहू या कोण भेटतंय इथे...

    続きを読む 一部表示
    10 分
  • # 1609: हरवणे, सापडणे. लेखिका : माधुरी ताम्हाणे देव. कथन : ( डॉ. गीतांजली राव )
    2024/10/27

    आतापर्यंत आपण आयुष्यात अनेकदा अनेक वस्तू, कागदपत्रे, माणसे अगदी नातीही हरवली असतील. त्यातल्या काही गोष्टी सापडल्याही असतील. हरवण्यासारखी एक साधी घटना आपल्याला किती विविध अनुभव देऊन जाते पहा! कधी कधी विचारांना एकदम वेगळी दिशाही मिळते. कशी ते पाहू या......

    続きを読む 一部表示
    9 分
  • # 1608: डोंगर फोडून उभारला रस्ता! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/10/27

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गुंडेगाव या गावातून इतर गावांना जोडणारा धड रस्ता नव्हता. सरकारी आश्वासने देखील हवेतच विरली. १९५७ ते १९९१ या काळात भापकर गुरुजी कोळेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
    तेव्हा त्यांना आपल्या गावामध्ये परत यायचे असलं तर तब्बल तीन गावे पायी पालथी घालण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
    कारण गुंडेगावाच्या समोर संतोषा नावाचा भला थोरला डोंगर ठाण मांडून बसला होता. तो पार करणे शक्य नव्हते, म्हणून भापकर गुरुजी आणि इतर गावकऱ्यांना सुध्दा ही पायपीट सोसावी लागायची.
    भापकर गुरुजींनी शासनाकडे पाठपुरवठा केला आणि डोंगर फोडून त्यातून रस्ता काढण्याची विनंती केली, पण शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य तो प्रतिसाद लाभला नाही.

    続きを読む 一部表示
    6 分