-
サマリー
あらすじ・解説
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गुंडेगाव या गावातून इतर गावांना जोडणारा धड रस्ता नव्हता. सरकारी आश्वासने देखील हवेतच विरली. १९५७ ते १९९१ या काळात भापकर गुरुजी कोळेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
तेव्हा त्यांना आपल्या गावामध्ये परत यायचे असलं तर तब्बल तीन गावे पायी पालथी घालण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
कारण गुंडेगावाच्या समोर संतोषा नावाचा भला थोरला डोंगर ठाण मांडून बसला होता. तो पार करणे शक्य नव्हते, म्हणून भापकर गुरुजी आणि इतर गावकऱ्यांना सुध्दा ही पायपीट सोसावी लागायची.
भापकर गुरुजींनी शासनाकडे पाठपुरवठा केला आणि डोंगर फोडून त्यातून रस्ता काढण्याची विनंती केली, पण शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य तो प्रतिसाद लाभला नाही.