• सदा स्मरावे जिजाऊ नाम...

  • 2023/01/05
  • 再生時間: 14 分
  • ポッドキャスト

सदा स्मरावे जिजाऊ नाम...

  • サマリー

  • जि म्हणजे जिवंतपणा. जा म्हणजे जागेपणा. बा म्हणजे बाणेदारपणा. ई म्हणजे ईश्वरार्पण वृत्ती. असा गुणसमुच्चय असणारी माता म्हणजे राजमाता जिजाबाई, अशा शब्दांत सद्गुरुदास महाराज जिजाऊ मासाहेबांचं यथार्थ वर्णन करतात. पौष शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच राजमाता जिजाऊंची जयंती. ही तिथी संशोधित करण्याचं महान कार्य प.पू. सद्गुरुदास महाराज (म्हणजेच पूर्वाश्रमीचे शिवकथाकार विजयराव देशमुख) यांनी केलं. आठ वर्षे अविरत संशोधन करुन त्यांनी ही तिथी शोधून काढली आणि त्याची नोंद आपणास शककर्ते शिवराय या त्यांच्या द्विखंडात्मक शिवचरित्रामध्ये पाहावयास मिळते. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच, १२ जानेवारी १५९८ ही तिथी इतिहासकारांबरोबर सरकारनेही मान्य केली. म्हणून, ७,८ व ९ जानेवारी १९८२ मध्ये सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्मोत्सव श्री सद्गुरुदास महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. अभूतपूर्व अशा या उत्सवानंतर दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव इथे साजरा होतो आहे. आजचा पॉडकास्ट मातोश्री जिजाऊंच्या समर्पित. त्यांच्याविषयी सद्गुरुदास महाराजांनी सांगितलेला शब्द नि शब्द श्रद्धापूर्वक ऐकावा, मनात कायम साठवून ठेवावा आणि त्यातून फुलणारी प्रेरणा मनोमनी जागवावी.
    続きを読む 一部表示

あらすじ・解説

जि म्हणजे जिवंतपणा. जा म्हणजे जागेपणा. बा म्हणजे बाणेदारपणा. ई म्हणजे ईश्वरार्पण वृत्ती. असा गुणसमुच्चय असणारी माता म्हणजे राजमाता जिजाबाई, अशा शब्दांत सद्गुरुदास महाराज जिजाऊ मासाहेबांचं यथार्थ वर्णन करतात. पौष शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच राजमाता जिजाऊंची जयंती. ही तिथी संशोधित करण्याचं महान कार्य प.पू. सद्गुरुदास महाराज (म्हणजेच पूर्वाश्रमीचे शिवकथाकार विजयराव देशमुख) यांनी केलं. आठ वर्षे अविरत संशोधन करुन त्यांनी ही तिथी शोधून काढली आणि त्याची नोंद आपणास शककर्ते शिवराय या त्यांच्या द्विखंडात्मक शिवचरित्रामध्ये पाहावयास मिळते. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच, १२ जानेवारी १५९८ ही तिथी इतिहासकारांबरोबर सरकारनेही मान्य केली. म्हणून, ७,८ व ९ जानेवारी १९८२ मध्ये सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्मोत्सव श्री सद्गुरुदास महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. अभूतपूर्व अशा या उत्सवानंतर दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव इथे साजरा होतो आहे. आजचा पॉडकास्ट मातोश्री जिजाऊंच्या समर्पित. त्यांच्याविषयी सद्गुरुदास महाराजांनी सांगितलेला शब्द नि शब्द श्रद्धापूर्वक ऐकावा, मनात कायम साठवून ठेवावा आणि त्यातून फुलणारी प्रेरणा मनोमनी जागवावी.
activate_buybox_copy_target_t1

सदा स्मरावे जिजाऊ नाम...に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。