-
サマリー
あらすじ・解説
एके दिवशी नारदमुनी मनुचा पुत्र प्रियव्रताला भेटायला गेले. प्रियव्रताने ज्ञानी ऋषी नारदांचं सन्मानानं स्वागत केलं आणि यथोचित आदरातिथ्य केलं. ज्ञान प्राप्तीच्या इच्छेपोटी त्यानं नारदमुनींना अनेक प्रश्न विचारले, पण त्याची ज्ञानर्जनाची तहान काही शमेना. त्याने नारदमुनींना प्रश्न केला"मुनिवर ! जेंव्हा काहीही घडणार असेल तेंव्हा देवांना त्याचे पूर्वानुमान असते, पण मला तुमच्याकडून अशा घटनेबद्दल जाणून घ्यायचे आहे जी अद्भुत आणि विचित्र असेल” नारदमुनींनी अगदी प्रसन्न चित्ताने स्वतःशी निगडीत एक विचित्र आणि अद्भुत घटना सांगितली ती अशी की ते साक्षात माता सावित्रीलाच ओळखू शकले नव्हते. एकदा नारदमुनी श्वेतद्वीप नावाच्या क्षेत्री गेले होते. हे स्थळ तिथल्या सुंदर सरोवराकरिता प्रसिद्ध पावले होते आणि नारदमुनी त्या सरोवराचं सौदर्य पाहण्यासाठी आतुर होते. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं की सरोवर कमळाच्या फुलांनी भरलेलं आहे आणि एक सुंदर स्त्री एखाद्या पुतळ्यासारखी तेथे निश्चल उभी आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
activate_buybox_copy_target_t1